आपण देतो म्हणून समोरचा मागतो.
कामे अडून राहतील,राहू देत.
खेपा घालुन पूर्ण करून घ्या.
काम करण्याचे तर पगार घेतात,
लागू द्या वेळ,संयम बाळगा.
आपण चुकीचे नाही ना ?
मग बिनदास्त राहा,काम होणे आहेच.
घाई आहे तर मागोवा घ्या.
पण सज्जनो ...लाच देऊ नका.
आपण देतो म्हणून ते मागतात.
आणि मग हा पायंडा पडतो,
त्यांना वाटते हा आपला हक्क आहे,
कोणी नकार दिला तर
त्याच्या नाकी नऊ येतात.
आपण काही चुकीचे करतो
याचे भानच राहत नाही.
ते अंगवळनी कधी होते
हे समजत नाही.
चटक लागते पैश्याची,
त्यातून मिळणाऱ्या ऐशोआरामाची
दलदलीत रुतत जातो.
पण ज्या सुखासाठी हे करतात
ते कधी मिळतच नाही.
आपण देतो म्हणून ते मागतात.
आपल्याला जो बदल हवा आहे ,
त्याचा भाग होणे गरजेचे आहे.
म्हणूनच सुरुवात आपल्यापासून करा
लाच मागितली तरी आपण द्यायची नाही.
बदल पाहण्यासाठी
आतुरतेने वाट पाहणारी
©आर्ची गांगण-साठे#lach#paisamilavne#kamhonyasaathikaikarave

एकदम बरोबर👍👍
ReplyDeletethank u
Delete👍👍
ReplyDelete