लाचेची वस्तू#magani#gift#kamachamobadla

Sunday, June 28, 2020

माणुसकी









माणुसकी जपली  कधी,केव्हा ,कशी??
दिसली नाही कधी
प्रत्येक गोष्टीला मुलामा लागला कधी सोय तर कधी नाइलाज कधी स्वतःचे दुःख कुरवाळले तर कधी स्वतःचा फायदा
आणि म्हणे माणुसकी जपली स्वतःचा स्वार्थ साधून
माणुसकी जपता  येते???
कधी कळले नाही मला
शिकवा मलाही,हुशार करा
नको, नको मी सर्किटच बारी वापर करतात माझा,
आहो करु देत
माझ्या नाशिबतले तर
घेऊन जाणार नाही
जे त्यांच्या नशिबात आहे
तेच त्यांना मिळणार
जगलो जर निस्वार्थी
आणि मनात उसळले
जर हजारो प्रश्न
डोळ्यांना झाले जर  असह्य  .. तरच तुमच्यातील माणुसकी जिवंत आहे
अहो, नुसती जिवंत असून चालत नाही तर त्याला जोड लागते कृतीची
नुसतीच कृतीची नाही तर आपलेपणाचा लागतो ओलावा,
मायेचा स्पर्श
कधी तरी ही माणुसकी जपून पहा पहा आनंदाने मन भरून जाते ओंजळ कायम भरलेली असते मनाला शांती मिळते आणि आयुष्य सुंदर होते जगण्यालाअर्थ , मनाला प्रफ्फुलीत करणारे क्षण सारे सारे काही आपलेच वाटू लागते.#manus#manuski#mauskivarprastavna 
 ©aarchee gangan-sathe
 


1 comment: