सेल्फ चेंज इज सेल्फ हेल्प![]()
छत्रपती शिवाजी टर्मिनस ला पूल पडला...काहींनी प्राण गमावले...काहींना इजा झाली...
जे ह्यात मृत पावले त्यांना श्रद्धांजली वाहिली...सोशीयल मीडिया वर RIP चा पाऊस पडला...
सरकारने मृतांसाठी व दुखापत झाली त्यांना काही रक्कम जाहीर केली.
इथे आपली जबाबदारी पूर्ण झाली का ? हो ,झाली तर...
कशी ती बघूया...काहींनी सरकार ला दोष दिला...बुलेट ट्रेनचा प्रस्ताव समोर आला होता...
मग काय घरात कोणत्याही प्रसंगात निर्णय न घेणार्यांनाही अचानक वाचा फुटली आणि आम्हाला
बुलेट ट्रेन नको पण निदान सुरक्षित पूल हवेत...आणि बरेच काही वक्तव्य झाले.थोडक्यात काय
तर नागरिकांनी आपली कामगिरी (जबाबदारी) पूर्ण केली असे म्हणण्यास काही हरकत नाही.
माणूस म्हणून आपण कुठे तरी कमी पडतोय असे माझे ठाम मत आहे. नागरिक ह्या नात्याने
आपले सुद्धा योगदान असावे आणि ते आपले कर्तव्य आहे. ही भावना जोपर्यंत प्रत्येकाच्या
मनात रुजत नाही तोपर्यंत ...अश्या घटना होत राहणार.
जो पूल पडला ,तो कधी बांधला? ,तो बांधताना कोणत्या दर्जेचे सामान वापरले?,त्याचे कोटेशन
कितीचे होते?,किती कोटेशन पास झाले?,त्यातली किती रक्कम पूल बांधण्यासाठी वापरली?,
घशात किती घातली?,दुसर्यांना किती चारले?,(भ्रष्टाचार किती केला)...ह्या सगळ्यावरच आपली
सुरक्षा अवलंबून आहे...
कोणताही अधिकारी,नोकरदार वर्ग अगदी सामान्य व्यावसायिक सुद्धा आधी भारताचा नागरिक
आहे आणि नंतर त्यांचा हुद्दा ...ह्याची जाणीव ठेवली तरच अश्या घटना घडणार नाहीत .... पण
नाही आपण ठरवलेले आहेच आपली कामे लवकर झाली पाहिजे आणि मग त्यासाठी कोणताही
मार्ग निवडावा लागला तरी चालेल . भले पैसे अनधिकृतपणे द्यावे लागले तरी चालेल.. पैसे
देतादेता कधी घेणाऱ्यांना सवय लागते आणि आपला हक्क समजू लागतात ते तरी त्यांना
आठवले तरी गंगेत घोडे न्हाले म्हणायला हरकत नाही.
असे करता करता भ्रष्टाचाराचे भाऊबंदकी कधी गोळा झाली ते समजले नाही...ती भाऊबंदकी
अश्या प्रकारची होती...
कागदावर-फाईल वर वजन ठेवणे,टेबलाखालून पाकिटे देणे, आमच्यावर लक्ष ठेवा,दिवाळी पाठवा,
चहापाण्याचा खर्च,काय ते मटणाचे होऊन जाऊ द्या.
भ्रष्टाचार करायचा मग तो चहापाण्याच्या खर्चाला पासून मटणाच्या रश्यापर्यंत..कोणतेही काम असो .
त्या कामाला भ्रष्टाचाराच्या भाऊबंदकीला सांभाळणे ही काळाची गरज झाली आणि कोणी ह्या
विरोधात बोलले की आपण बोलायला मोकळे.... कोणतेही ,अगदी छोट्यातले छोटे काम पैसे
दिल्याशिवाय होत नाही.
एक तर ही सवय लावली कोणी?आपण...ती पुढे चालू कोण ठेवतं? आपणच.....मग ह्या सगळ्याला
जबाबदार कोण?...अहो आपणच...निम्म्याहून अधिक नागरिक नोकरदार वर्ग आहे. आपण आपले
कर्तव्य,जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो का ?(जेव्हा आपण दुसऱ्याचे हात ओले करतो तेव्हा
साहजिकच आपले हातही ओले होतात) टाळी एका हाताने वाजत नाही असे म्हणतात ...ते
तितकेच खरे आहे...टाळी कधीच एका हाताने वाजत नाही..यह सब मिलीभगत का नातीजा हैं ।
...आणि हे सगळे आपणच थांबवले पाहिजे...कोणतीही गोष्ट असो अगदी घरातल्या गॅस पासून
मुलांच्या ऍडमिशन पर्यंत...जे जसे मागतील तसे देतो आणि क्रोधाने नुसती लूट चालू आहे असे
आपण म्हणतो.तिथल्या कर्मचाऱ्यांचे ते कामच असते ..त्याचा पगारही घेतात. पण आव मात्र असा
आणतात की काम खूप कठीण होते पण निव्वळ मी त्यात लक्ष घातले म्हणून काम पूर्ण झाले.
का आपण जाब विचारत नाही?काय होते...वेळ कमी पडतो,घाबरतो ,लढण्याची हिम्मत नाही...की
सगळे कसे लगेच,पटकन मिळाले पाहिजे..
आपण देतो म्हणून ते घेतात...फारफार तर काय? काम एका फेरीत होणार नाही,३-४ खेपा
पडतील.फक्त सुरुवात मात्र प्रत्येकाला स्वतः पासून करायची आहे.
सैनिक आपले कर्तव्य चोख पार पाडतो.का? कारण त्याचे देशावर प्रेम आहे . त्यांचे कर्तव्य आधी
देशाप्रती असते . त्यांनी आपल्यासमोर आदर्श ठेवला आहे. असेच कर्तव्य आणि प्रामाणिकपणा
आपण जोपासला तर...सुरक्षा सरकार कडून मागावी लागणार नाही, आपणच आपले जीवन सुरक्षित
करू.
आज गरज आहे आपल्यातील माणसाला,माणुसकीला जागे करण्याची,स्वतःला बदलण्याची,प्रामाणिक
राहण्याची,सतर्कता बाळगण्याची...गरज आहे योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची,योग्य निर्णय
घेण्याची....फक्त एवढेच आपण करायचे आहे.मग दोष देण्यासारखे काही होणारच नाही.
First change yourselves to see the change in others...Self change is self help

समाज घडतोय पण घडणाऱ्याला बिघडवणारी मंडळी आहेत त्याचं काय?
ReplyDeleteNice 👏 👏
ReplyDeleteSo true..Society is ultimately made up of each one of us, so the responsibility lies with each one and the change can begin with each one..
ReplyDelete👌👍
ReplyDelete👌👍
ReplyDelete👍
ReplyDelete👌👌👍
ReplyDelete👌👍👍
ReplyDeleteKhup chan.swatala badalnyachi vel aahe.jo paryant aapan badalat nahi to paryant samaj badlnar nahi.karan sadhya mansala aapal kam zal na mag samorcha karanara kasahi aso mag bhale lach ghenara asel tyachashi den ghen nahi ashi paristhiti aajachya manavachi aahe.tyamule he lubadnare varchadh hotat.tyamule he Sagal karayala aapanch bhag padato karan apalyala ya goshtichi jarahi kalaji nahi tyamule aata tari jag zal pahije.swata badala desh nakki badalel.samaj kantakala dhada shikava.
ReplyDeleteCongratulations Archee mam, Very well composed
ReplyDeletearticle. You rightly have pointed to the burning issues of the society. Your article made us to introspect & shaken us to do something for the well being of the human being.You perfectly shown that moral values are lost in the society. Your social feelings can be read here.In today's busy life people turn a deaf ear to such evil customs in the society.As a part of the society we should oppose such crimes through different ways. We need to eradicate these thinking.
I appreciate your efforts to do this social work. All the best.Keep writing.Many more to come from you. 👍👍👍
This comment has been removed by the author.
ReplyDelete