आज आधी कुठे कुठे आणि कसे जायचे ह्याचा क्रम प्रीती आपल्या डोक्यात मांडत होती.
अरे देवा!रजेचा अर्ज द्यायचा राहूनच गेला. त्या सोबत लग्नपत्रिकाही जोडली पाहिजे नाहीतर रजा मंजूर होणार नाही. प्रीतीने पर्स उघडून अर्ज लग्नपत्रिका आहे का ते तपासले आणि निश्चिन्त झाली.
तिला आज सगळ्यात आधी ऑफिस ला जाऊन अधिकाऱ्यानं कडून स्वतःच्या लग्न साठी रजा मंजूर करून घ्यायची होती. थोडेफार का होईना पण तिच्या मनावर दडपण आले होते.
ऑफिस ला पोहचली तर साहेबमॅडम अजून आल्या नव्हत्या. अर्ज त्यांच्या टेबलवर ठेवून जावे तर शिपाई आधीच ओरडून सांगून गेला.अर्ज रजेचा आहे ना?... टेबलवर ठेवू नका बाईना भेटून त्यांच्या कडे द्या.
आधी असे काही नियम नव्हते फक्त अर्ज अधिकाऱ्यानं पर्यंत पोहचणे महत्वाचे होते. जसे वारे वाहते त्या दिशेने जावे म्हणतात ते काय खोटे नव्हे. नियम केला आहे आणि त्याच्या विरुद्ध वागणे म्हणजे स्वतःला त्रास करून घेणे.
प्रीतीने मॅडम ना भेटून मगच ऑफिस ला जायचा निर्णय घेतला कारण ह्या आधी तिने मैत्रिणी सोबत अर्ज पाठवुन दिला होता .
अर्जदाराने स्वतः येऊन भेटावे असा निरोप मैत्रिणी जवळ दिला.म्हणूनच आज ती स्वतः अर्ज घेऊन भेटायला आली होती.
ती ऑफिस बाहेर बेंच वर बसली .मनात अनेक विचार येऊ लागले ..का बरे मॅडमनी भेटायला बोलावले असेल?काय काम असेल?गेल्या महिन्यात तन्वीचा अर्ज तर घेतला...ती स्वतः आली नव्हती .मग मलाच का बोलावले बरे .. माझ्या कामा संबंधित काही तक्रार आली का?पण मी तर दिलेले काम चोख पार पडते... अनेक विचार मनात येऊ लागले आणि ती अधिक धास्तावली.
तिच्या विचारात ती एवढी गुरफटली की कधी मॅडम आल्या हेही तिला समजले नाही.
शिपायाने दोन वेळेस आवाज दिल्यावर प्रीती भानावर आली
आणि मॅडमच्या केबिन मध्ये गेली. मॅडमनी तिला जरा हटकूनच विचारले,"काय मग लग्न ठरले तर भेटून जायचे ना.?...खरेदी सुरू असताना भेटली असतीस तर आज ती वस्तू मला मिळाली असती....राहू दे .रजेहून हजर झालीस की माझी वस्तू घेऊन ये..
प्रीती च्या डोक्याच्या पार भुगा झाला होता. तिच्याकडे तर मॅडम ची कोणतीच वस्तू नव्हती....बरं खरेदी करताना भेटायचे म्हणाल्या..काही कळेना झाले.. शेवटी तिने मॅडम ना विचारले,"कोणती वस्तू राहिली आहे माझ्याकडे?
रजा मंजूर करून हवी तर ती अशीच होते की काय?पुन्हा कामावर रुजू हो ...आणि येताना काठपदराची साडी घेऊन ये .मग करू तुझी रजा मंजूर...
प्रीती ला काय बोलावे ते समजेना..ओके म्हणून तिथून बाहेर पडली.
कीव आली तिला माणसाच्या ह्या प्रवृत्तीची ..काय म्हणावे ह्या वृत्तीला..हव्यास आणि ह्या हव्यासापोटी मिळालेली ती वस्तू आणि त्यातून मिळणारा आनंद हा कित्ती काळ टिकणार आहे? देणाऱ्या व्यक्तीचा तळतळाट लागणार तो वेगळा.
अधिकारी म्हणून चांगला पगार घेता,राहायला घर,गाडी.. सगळे आहे मग अजून तुमच्या सुखाची व्याख्या तरी काय आहे?
प्रीती ला स्वतःचा राग आला. ओके न म्हणता अशीच निघून आली असती तर काय बिघडले असते?लग्न माझे .. सुट्ट्या माझ्या .. आणि ह्यांचे काय ??रजा नंतर मंजूर करू....
तिने मनाशी पक्के ठरवले काही झाले तरी ह्या बाईला साडी द्यायची नाही. फारफार तर काय ? मला थोडे दिवस त्रास होईल. पण मी कामात चोख आहे तर त्याने फरक पडणार नाही. आपण भले आणि आपले काम भले.
कोणीतरी दिले म्हणून मागण्याची हिम्मत झाली . आता मी देणार नाही तर नक्कीच नंतर परत मागणी करायच्या आधी विचार करेल...
मनाची नाही निदान जनाची लाज बाळगली तरी खूप.. पण अश्या लोकांना एकाच्या विरोधाने फरक पडत नाही तर प्रत्येकाने विरोध दर्शवला
तरच ह्याला आळा बसेल.#gift#magani#kamachamobadla
©आर्ची गांगण-साठे

यत्र तत्र सर्वत्र... हेच सुरू आहे. पूर्वी चुकीचे काम करण्यासाठी देवाणघेवाण असायची आता जायज काम तातडीने करण्यासाठी मागणी होते.
ReplyDeleteWahh..
ReplyDeleteNice...keep it up🙌🙌👍👍
ReplyDeleteTrue fact of department...keep up👍👌👌
ReplyDeleteTrue fact of department...keep up👍👌👌
ReplyDeleteTrue fact of department...keep up👍👌👌
ReplyDeleteTrue fact of department...keep up👍👌👌
ReplyDeleteNice
ReplyDeletethank u sir
ReplyDelete